आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपूर्ण कर्जमाफी, पिकांना हमी भाव देण्याची मागणी; किसान मुक्ती संसदेचा ठराव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि पिकांना हमी भाव द्यावा, अशा दोन महत्त्वाच्या मागण्या देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी ‘किसान मुक्ती संसदे’त मंजूर केल्या. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या (एआयकेएससीसी) बॅनरखाली शेतकऱ्यांच्या १८० संघटना सोमवारी एकत्र आल्या होत्या. एकूण १९ राज्यांचा १० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही किसान मुक्ती संसद सुरू झाली.  


समित्याच्या नेत्यांनी सांगितले की, किसान मुक्ती संसदेत मंजूर झालेल्या या मागण्या स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी हे लोकसभेत आणि माकपचे के. के. रागेश हे राज्यसभेत खासगी सदस्यांचे विधेयक म्हणून मांडतील. ‘खासगी सदस्यांचे हे विधेयक संसदेत मंजूर व्हावे यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मागणार आहोत,’ अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे नेते अशोक ढवळे यांनी दिली. ढवळे म्हणाले की, ‘निवडून आल्यावर शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी दिले होते. पण ते पूर्ण झाले नाही. इंधन, कीटकनाशके, खते आणि पाणी यांच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे पिकांना लागणारा खर्च आणि उत्पन्न यात असंतुलन निर्माण झाले आहे.’‘एकूण खर्चापेक्षा दीड पट भाव पिकांना देण्यात येईल, हे आश्वासन दिल्यामुळे मोदींना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यांनी आता ते पूर्ण करावे,’ अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. नर्मदा बचाव आंदोलनाच्या समन्वयक मेधा पाटकर म्हणाल्या की, ‘किसान मुक्ती संसदेत मंजूर झालेले ठराव एेतिहासिक आहेत.’ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील ५४५ महिलाही उपस्थित होत्या.  

बातम्या आणखी आहेत...