आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; अर्थ राज्यमंत्र्यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत सांगितले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या तरी सरकारच्या विचाराधीन नाही. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात पीक कर्जाची फेररचना आणि रूपांतर, नवीन कर्जाची उपलब्धता यांचा समावेश असल्याचे सिन्हा म्हणाले. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक संकट जाहीर केल्यानंतरच या उपाययोजना लागू होतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा म्हणून फेररचना झालेल्या कर्जावर २ टक्के व्याजदर आकारण्यात येईल, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...