आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Prime Minister Atal Bihari Vajpayee Can Get Bharatratna Award

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना मिळणार \'भारतरत्न\'?भाजप खासदारांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' मिळण्याची शक्यता आहे. अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्‍यात यावे, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केंद्र सरकारकडे मंगळवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ही मागणी मान्य केल्यास येत्या 26 जानेवारी प्रजासत्तक दिनी 'भारतरत्न'ने वाजपेयींचा सन्मानित करण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

भारतातील अनेक दिग्गजांसह काही पंतप्रधांनाही 'भारतरत्न' सन्मानाने गौरवण्यात आले आहे. आता त्यात अटल बिहारी वाजपेयींच्या नावाचाही समावेश होणार आहे. भारत सरकारने वाजपेयींच्या वाढदिवशी (25 डिसेंबर) 'भारतरत्न'साठी त्यांच्या नावाची घोषणा करावी, अशी मागणी केली आहे.
वाजपेयींना भारतरत्न मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. आता केंद्रात भाजपचे सरकार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची ही मागणी पुन्हा एकदा बळावली आहे.

अल्प कार्यकाळात प्रभावी काम करणार्‍या पंतप्रधानांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख होतो. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान म्हणून काम केले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, अटल वाजपेयींसह, बोस, कांशीराम आणि मालवीय यांनाही 'भारतरत्न' द्यावा, अशी यापूर्वी होती मागणी...