आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Rail Minster LN Mishra Murder Case: All Four Convicts Sentenced To Life Imprisonment

माजी रेल्वेमंत्री मिश्रांना 40 वर्षांनंतर मिळाला न्याय; सर्व मारेकर्‍यांना जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांना तब्बल 40 वर्षांनंतर न्याय मिळाला. मिश्रा हत्याकांडातील चारही दोषींना कडकडडूमा कोर्टाने गुरुवारी जन्मठेप सुनावली. जिल्हा न्यायाधिश विनोद गोयल यांनी दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अॅड. रंजन द्विवेदी(66), संतोषानंद अवधूत(75), सुदेवानंद अवधूत(79) आणि गोपाल जी(73) अशी दोषींची नावे आहेत.

माजी रेल्वेमंत्री मिश्रा हत्याकांडातील दोषींना 39 वर्षे 11 महिने आणि 16 दिवसांनी शिक्षा सुनावण्यात आली. गेल्या 8 डिसेंबरला वरील चौघांना दोषी ठरवले होते. चौघे दोषी आनंद मार्ग संघटनेचे सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे.
न्यायाधिश विनोद गोयल यांनी सांगितले की, माजी रेल्वेमंत्री एल.एन.मिश्रा हत्याकांड प्रकरणी चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा योग्य आहे. चौघांनी षडयंत्र रचून रेल्वेमंत्री मिश्रा यांची निर्घृण हत्या केली होती.

दि‍ल्लीत 22 न्यायाधिशांनी केली सुनावणी, 720 पेक्षा जास्त तारखा...
माजी रेल्वेमंत्री मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी एकूण 720 पेक्षा जास्त तारखांना सुनावणी झाली. दिल्लीत कनिष्ठ कोर्टात एकूण 22 न्यायाधिशांनी या खटल्याची सुनावणी केली. 200 पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. त्यापैकी सरकार पक्षातर्फे 161 तर बचाव पक्षातर्फे 40 साक्षीदारांना कोर्टात सादर करण्‍यात आले.

एल.एन.मिश्रांवर गर्दीतून फेकण्यात आला होता बॉम्ब...
2 जानेवारी, 1975 रोजी समस्तीपूरमध्ये ब्रॉड गेज रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दिवंगत रेल्वेमंत्री मिश्रांवर गर्दीतून बॉम्ब फेकण्यात आला होता. हल्ल्यात मिश्रा गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना मिश्रा यांचा मृत्यु झाला होता.