आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या हा उपाय नाही, हक्कांसाठी संघर्ष करू...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची आर्त हाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मध्य प्रदेशहून निघालेली किसान मुक्ती यात्रा राज्ये पार करत काल (बुधवारी) दिल्लीत पोहोचली. यात्रेला 150 वर शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. जंतर-मंतर येथे भरलेल्या किसान मुक्ती संसदेत महाराष्ट्रासह देशातील 400 वर शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांनी व्यथा मांडल्या.
 
लहानगा आरुष पाटील म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी आत्महत्या केली याचे मला दु:ख वाटते. मात्र मी देशातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आत्महत्या हा यावरचा उपाय नाही. आपल्याला न्याय्य अधिकारांसाठी संघर्षाचा मार्ग अवलंबावा लागेल.’
बातम्या आणखी आहेत...