आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM केजरीवालांच्या पोस्टरला फासले काळे, गजेंद्र सिंहवर अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शेतकरी गजेंद्र सिंहच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पोस्टरवर काळे फासण्यात आले)
नवी दिल्ली- दिल्लीत जंतर-मंतरवरील आम आदमी पक्षाच्या (आप) सभेदरम्यान राजस्थानच्या दौसातील शेतकरी गजेंद्र सिंह याने सगळ्यासमोर आत्महत्या केली. ‍त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नव्या वादात सापडले आहेत. दुसरीकडे, केजरीवाल यांच्या पोस्टरवर विरोधकांनी काळे फासले आहे. दिल्लीत इंडिया गेटजवळ लावण्यात आलेल्या 'आप'च्या पोस्टरवर अरविंद केजरीवाल यांच्या चेहर्‍याला काळे फासण्यात आले आहे. तसेच त्यांना 'हत्यारा' संबोधले आहे.

दिल्ली पोलिस गजेंद्र सिंह यांच्या आत्महत्या प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपवणार आहे. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यावर संसदेत निवेदन देणार आहे. त्यामुळे संसदेत विरोधक गदारोळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे, शेतकरी गजेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर राजस्थानमधील नांगल झमरवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी राजस्थान कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट, अशोक गहलोक आणि पूर्व केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मृत गजेंद्रच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाचे सात्वंन केले.

गजेंद्र सिंहचे प्राण वाचवण्यासाठी केजरीवाल यांच्याकडे होते 20 मिनिटे...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे व्यासपीठावर पोहोचण्याच्या 20 मिनिटांनंतर शेतकरी गजेंद्र सिंहने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसे पाहिले तर गजेंद्र दोन तासांपासून झाडावर चढला होता. तो वारंवार आत्महत्या करणार असल्याचे सांगत होता. परंतु सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. केजरीवाल व्यासपीठावर येताच काही मिनिटांत गजेंद्रने सुसाइड नोट फेकून आपल्या उपरण्याने गळफास घेतला. तरी देखील 'आप' नेत्याची भाषणबाजी सुरुच होती.

एका मिनिटात 20 जणांना फेटा बांधून द्यायचे गजेंद्र सिंह
42 वर्षीय गजेंद्र सिंह हे दौसा येथील नांगल झमरवाडा गावातील रहिवासी होते. त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. गावातील राजकारणावर लक्ष ठेवणारे गजेंद्र जयपूरला जात असल्याचे सांगून घरून निघाले होते. परंतु ते दिल्लीत पोहोचले. गजेंद्र एका मिनिटात 20 जणांना फेटा बांधून देत असत. गजेंद्रच्या नावावर 15 एकर शेती आहे. बुधवारी गजेंद्रच्या चुलत बहिणीचे लग्न होते.
पुढील स्लाइड्‍वर क्लिक करून पाहा, घटनेची छायाचित्रे...