आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बियाणे खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची सूट द्यावी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बियाणे खरेदीसाठी ३० डिसेंबरपर्यंत पाचशे आणि एक हजाराच्या नोटा वापरण्यासंबंधी सूट देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. त्यामुळे बियाणे तत्काळ लागणार आहेत तसेच नोटांचीही कमतरता असल्याने जुन्या नोटा वापरण्याची परवानगी दिल्यास वेळेवर पेरणी करता येईल, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी विविध वर्गातील लोकांशी भेटणे सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी त्यांना भेटले. पदाधिकारी जेटलींना म्हणाले की, नोटबंदीमुळे शेतीची उत्पादने खरेदी करण्यासाठी कोणी समोर येत नाही. बहुतेक शेतकरी खरेदी-विक्री नगदी स्वरुपात करतात. या निर्णयामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बैठकीला अर्थ प्रकरणांचे सचिव शक्तिकांत दास आणि अर्थ सचिव अशोक लवासा यांची उपस्थिती होती. दरम्यान, रेल्वे आणि विमान वाहतुकीत ज्याप्रमाणे नोटा वापरण्यासाठी सुट दिली आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही सुट लागू असावी, अशी मागणी कंसोर्टीयम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशनचे महासचिव बी.डी. रेड्डी यांनी केली. तर ई-कनेक्टेड सर्व जिल्हा बँकांच्या शाखांमध्ये नोट बदण्याची परवानगी द्यावी, असे भारतीय कृषक समाजचे अध्यक्ष अजय वीर जाखड यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...