आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारुक अब्दुल्लांची जीभ पुन्हा घसरली; जम्मू- काश्मीरमधील जनतेला म्हणाले \'महाचोर\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांची जीभ पुन्हा घसरली आहे. फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू- काश्मीरमधील जनतेला 'महाचोर' म्हणून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

विरोधी पक्ष पीपुल्स डेमोक्रेटिक पक्षाने (पीडीपी) मुख्यमंत्री उमर अबदुल्ला यांचे वडील आणि नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेता फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधात सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली.अब्दुल्ला यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला आहे.त्यामुळे अब्दुल्ला यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.चे पीडीपीचे नेता महबूबा मुफ्ती यांनी सांगितले.

दिल्लीत आयोज‍ित एका कार्यक्रमात फारूक अब्दुल्ला यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. जम्मू-कश्मीरमधील वीज चोरीबाबत बोलताना काश्मीरमधील जनता चोर नाही तर महाचोर असल्याचे फारुक अब्दुल्ला म्हणाले.

दरम्यान, राज्यमंत्री अली मोहम्मद सागर यांनी फारुख अब्दुल्लांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत सावरासारव करण्याचा प्रयत्नही केला. सागर म्हणाले, फारूक यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे