आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी 10 वेळा पंतप्रधान झाले तरी कलम 370 उठवू शकणार नाहीत, फारुख अब्दुल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मिरला विशेष राज्याच्या दर्जा देणाऱ्या 370 या कलमावरून सध्या बरीच राजकीय चर्चा सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत कलम 370 उठविले जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले असले तरी इतर राजकीय पक्षांनी हा मुद्दा धरून भाजपला टार्गेट करण्यास सुरवात केली आहे. आता या वादात जम्मू आणि काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी उडी मारली आहे. नरेंद्र मोदी 10 वेळा पंतप्रधान झाले तरी त्यांना कलम 370 उठविता येणार नाही, असा हल्ला अब्दुल्ला यांनी केला आहे.
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनी भारत आणि पाकिस्तानच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलविली होती. त्याला फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, की नरेंद्र मोदींना 10 वेळा पंतप्रधानपद भूषविण्याची संधी मिळाली तरी त्यांना जम्मू आणि काश्मिरला विशेष राज्याच्या दर्जा देणारे कलम 370 उठविता येणार नाही. प्रत्येक विषयावर चर्चा घडवून आणण्याची भाजपची मागणी असते. परंतु, ते स्वतःच यावर चर्चा करण्याच्या तयारीत नसतात.
काश्मिर प्रश्नावर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत बोलताना अब्दुल्ला म्हणाले, की तुम्ही काश्मिर जिंकू शकत नाहीत. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी हे माझ्या रक्ताने लिहून देण्यास तयार आहे.
आणखी काय म्हणाले फारुख अब्दुल्ला वाचा पुढील स्लाईडवर