आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farooq Abdullah Strongly Criticized The Alleged Politicization Of Surgical Strikes

निवडणुका जिंकण्यासाठी होत आहे सैनिकांच्या रक्ताचा सौदा, फारुख अब्दुल्लांचे टिकास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अब्दुल्लांनी अटलजींचा हवाला देऊन त्यांच्या मार्गाने का चालत नाही, असा सवाल केला. - Divya Marathi
अब्दुल्लांनी अटलजींचा हवाला देऊन त्यांच्या मार्गाने का चालत नाही, असा सवाल केला.
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सर्जिकल स्ट्राइकवर सुरु असलेल्या राजकारणाबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, 'आज निवडणुकीसाठी सैनिकांच्या रक्ताचा सौदा केला जात आहे. मात्र सैनिक कोणत्याही राजवटीचा नाही, तो हिंदुस्थानचा जवान आहे, भारताचा आहे.'

आणखी काय म्हणाले अब्दुल्ला
- फारुख अब्दुल्ला गुरुवारी पुंछ येथे म्हणाले, 'मी आज मोदींना विचारु इच्छितो, तुम्ही अटलजींना नेते मानता, मग त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत का नाही?'
- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अब्दुल्ला म्हणाले, 'सैनिक कोणत्याही राजकीय पक्षांचा किंवा राजवटीचा नसतो, तो देशाचा, भारताचा जवान असतो.'
- अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळाला उजाळा देत अब्दुल्ला म्हणाले,'अटलजी म्हणाले होते, मित्र बदलता येतील परंतू शेजारी बदलता येणार नाही. जर मोदी वाजपेयींना नेता मानत असतील तर त्यांच्या धोरणांनुसार का चालत नाहीत?'
- अब्दुल्ला यांच्याप्रमाणेच याआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सैनिकांच्या रक्ताच्या दलालीचा आरोप मोदींवर केला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
- फारुख अब्दुल्ला यांचे चिरंजीव जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही गेल्या महिन्यात ट्विट करुन भाजप सर्जिकल स्ट्राइकचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता.
बातम्या आणखी आहेत...