आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात लाँच होणार ‘तेज’ गुगल मोबाइल पेमेंट सेवा;देशात 32 लाख कोटींचे डिजिटल पेमेंट मार्केट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आता गुगलवरूनही आॅनलाइन पेमेंट करता येईल. गुगल लवकरच भारतात ‘तेज’ नावाने आपली मोबाइल पेमेंट सेवा सुरू करत आहे. अशी सेवा असणारा भारत जगातील तिसराच देश असेल. सध्या गुगलची पेमेंट सेवा फक्त अमेरिका व ब्रिटनमध्येच सुरू आहे. या सेवेसाठी गुगल देशातील खासगी बँकांसोबत करारही करू शकते. 

माध्यमांतील वृत्तांनुसार गुगल आपली तेज पेमेंट सर्व्हिस १८ सप्टेंबरला लाँच करणार आहे. तथापि, गुगलकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतात ही सेवा सुरू करण्यामागे ऑनलाइन मार्केटचा विकास हे महत्त्वाचे कारण आहे. याशिवाय मोबाइल इंटरनेट युजर्सची वाढती संख्या आणि स्मार्टफोनची विक्री हेही कारण आहे. भारत सध्या जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे. दुसरीकडे, गुगल व रिसर्च एजन्सी बीसीजीच्या एका अहवालानुसार २०२० पर्यंत भारतात डिजिटल पेमेंट मार्केट ३२ लाख कोटी रुपयांवर जाईल. ते देशाच्या जीडीपीच्या १५% असेल. म्हणूनच गुगलला ही बाजारपेठ गमवायची नाही. दरम्यान, देशात डिजिटल पेमेंट्सचे इन्फ्रास्ट्रक्चर २०१७ च्या अखेरीस तीन पटींनी वाढण्याची आशा आहे. इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयानुसार यंदा वर्षाअखेरीस देशात सुमारे ५० लाख पॉइंट ऑफ सेल उपकरणे असतील. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी जानेवारीतच सांगितले होते की, कंपनी भारतात पेमेेंट सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. तेज ही सेवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) आधारित सेवा असेल. यात लोकांना गुगल वॉलेट व अँड्रॉइड पेमेंट सेवाही मिळेल. यूपीआय ही एक पेमेंट यंत्रणा असून ती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनसीपीआय) लाँच केली आहे. यूपीआयद्वारे मोबाइल प्लॅटफॉर्मवर दोन बँक खात्यांदरम्यान तत्काळ पैसे हस्तांतरित करण्याची सेवा उपलब्ध करून दिली जाते. 
 
व्हॉट्सअॅप, फेसबुक व ट्रूकॉलरही रांगेत
गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपने म्हटले होते की, त्यांच्या अॅपमध्ये लवकरच पैसे ट्रान्स्फर करणारे फीचर जोडले जाईल. भारतात व्हॉट्सअॅपचे २० कोटी युजर्स आहेत. याशिवाय फेसबुक, ट्रूकॉलर, फ्लिपकार्ट टेक कंपन्यांनीही मोबाइल पेमेंट सेवा सुरू करण्याचे सूतोवाच केलेले अाहे.
बातम्या आणखी आहेत...