आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fasting TDP Leader Chandrababu Naidu Evicted By Police From Andhra Bhavan Here Amid Strong Protests By His Party Workers

तेलंगणाविरोधात उपोषणाला बसलेल्‍या चंद्राबाबू नायडुंना जबरदस्‍तीने नेले रुग्‍णालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- तेलंगणाच्‍या मुद्यावरुन दिल्‍लीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांचे उपोषण मोडून काढण्‍यासाठी दिल्‍ली पोलिसांनी त्‍यांना जबरदस्‍तीने हलविले आहे. चंद्राबाबू नायडुंना राम मनोहर लोहिया रुग्‍णालयात नेण्‍यात आले आहे. तेथे त्‍यांना सलाईन चढविण्‍यात आल्‍याचीरही माहिती आहे. नायडुंची प्रकृती खालावल्‍यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. त्‍यांना उपोषणस्‍थळ सोडण्‍याचे निर्देशही देण्‍यात आले होते. परंतु, हायव्‍होल्‍टेज ड्राम्‍यानंतर नायडुंना हलविण्‍यात आले.

चंद्रबाबू नायडू 5 दिवसांपासून आंध्र प्रदेशच्‍या विभाजनाविरुद्ध नवी दिल्‍लीत आंध्र भवन येथे उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्‍यांना जबरदस्‍तीने उपोषण स्‍थळावरुन उचलले आहे. शेकडो समर्थकांनी पोलिसांचा विरोध केला. परंतु, विरोधाला न जुमानता पोलिसांनी चंद्रबाबूंना उचलले. कोणत्‍याही परिस्थितीत तेलंगणा निर्मितीच्‍या निर्णयावरुन माघार घेणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्‍यामुळे विरोध मोडून काढण्‍याचा प्रयत्‍न सरकारकडून होत आहे.