आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Father Daughter Shot At Metro Station, Daughter Died

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेट्रो स्टेशनमध्ये पत्नीवर गोळ्या झाडणर्‍या पतीची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत मंगळवारी कडकडडूमा मेट्रो स्टेशनवर स्वतःच्या पत्नीवर गोळीबार करणार्‍या पतीने आज (बुधवार) आत्महत्या केली आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादनगरमध्ये पवनने रेल्वेस्टेशन जवळील झाडाला फास लावून आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दिली पोलिस मुरादनगरला रवाना झाले आहेत. मंगळवारी पवनने पत्नी दिप्ती आणि तिचे वडील बिशमदास यांच्यावर गोळीबार केला होता. यात दिप्तीचा जागीच मृत्यू झाला तर, तिचे वडील गंभीर जखमी आहेत. गोळया झाडल्यानंतर पिस्तूल आणि गोळ्या तिथेच टाकून पवन पळून गेला होता.

पवनचा दिप्तीसोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही केलेला होता. त्यामुळे ती माहेरी राहत होती. कौटूंबिक वादातून ही हत्या आणि आत्महत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज दिल्ली पोलिसांनी वर्तवला आहे.

स्लाईडला क्लिक करून पाहा, घटनास्थळाची छायाचित्रे.