आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नराधम पित्याचे चार वर्षे आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील बलात्काराच्या घटनांवर सुप्रिम कोर्टाने टिप्पणी केली असून राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दिल्लीच्या करावल नगरमध्ये एक अल्पवयीन मुलगी चार वर्षांपासून पित्याच्या वासनेची शिकार झाली आहे.

पोलिसांनी पिडीत मुलीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली आहे. वासनांध बापाने जेव्हा मोठ्या मुलीवर वाईट नजर टाकली तेव्हा तिने तत्काळ आईला त्याबद्दल सांगितले. मोठ्या बहिनीची हिम्मत पाहून चार वर्षांपासून नराधम वडीलांचे अत्याचार सहन करणा-या अल्पवयीन मुलीने आई आणि बहिनीला तिच्यासोबत घडलेल्या दुष्कृत्याची माहिती दिली. त्यानंतर आईने दोन्ही मुलींना घेऊन पोलिस स्टेशन गाठले आणि पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.

सुप्रिम कोर्टाने बलात्काराच्या घटनांबद्दल केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे, की अशा घटना आकस्मिक नसून बहुतेकवेळा सोचून समजून केलेला कट असतो. बलत्कार हा केवळ 'लैंगिक गुन्हा' नसतो, तर आक्रमकतेसह पिडीतेवर वर्चस्व गाजवण्यासारखे आहे.