आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख \'शरीयत\'चा गुन्हेगार;सरोगसीतून जन्माला येणारे बाळ ठरवले अवैध!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बॉलिवूडचा 'किंगखान' शाहरुख खानच्या मागे लागलेले शुक्लकास्ट संपण्याची चिन्हे दिसत नसताना त्याच्या विरोधात मरकजी दारुल इफ्ता दरगाह आला हजरत यांनी एक फतवा जारी केला आहे. शाहरुख हा शरीयत कायद्यानुसार गुन्हेगार आहे. तसेच 'सरोगसी'तून (भाड्याने घेतलेले गर्भाशय) जन्माला येणारे त्याचे तिसरे बाळही अवैध असल्याचे दारुल यांनी काढलेल्या फतव्यात म्हटले आहे. तसेच शाहरुख आणि गौरीच्या बाळाला जन्म देणार्‍या मातेलाही प्रायश्चित करण्याचा सल्ला दिला आहे.

दुसरीकडे, शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हिने लिंगनिदान चाचणी केल्याचा आरोप रेडिओलॉजिस्ट संघटनेने केला आहे. ही चाचणी करणार्‍या रेडिओलॉजिस्ट तसेच शाहरुखविरुद्ध चौकशी करण्याची मागणी इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅँड इमेजिंग असोसिएशनने आरोग्य खात्याकडे केली. त्यानुसार आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी शाहरुखच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.