आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fatwas Are Political religious Views, Can't Interfere, Says Supreme Court

‘फतवे लादता येणार नाही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुस्लिम धर्मगुरूंचे फतवे लोकांवर बळजबरीने लादता येणार नाही. फतव्यांचे पालन न करणार्‍यास त्रास दिला जात असेल तर सरकारने त्याला संरक्षण दिले पाहिजे, असेही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

वकील विश्वलोचन मदन यांनी शरीयत न्यायालयांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सी.के. प्रसाद यांनी ही टिप्पणी केली. कोर्टाने सांगितले की, फतव्यांचे पालन करणे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून आहे. दारूल काजा व दारूल इफ्तासारख्या संस्था चालवणे धार्मिक बाब आहे. मात्र त्यामुळे लोकांच्या हक्कांवर गंडांतर येत असेल तर न्यायालयांनी हस्तक्षेप केला पाहिजे. फतवा जारी करण्याचा हक्क कोणता कायदा देतो? कोणता अधिनियम भविष्यवाणी करण्याचा अधिकार देतो? असा सवाल कोर्टाने केला.