आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट इंजिनमुळे जमिनीवर आले किंगफिशर; माल्या म्हणाले, देशांत 21 विमानांत होतोय वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- किंगफिशर एअरलाइन्स बंद होण्यामागे निकृष्‍ट इंजिन हे देखील एक कारण असल्याचे विजय माल्या यांनी सांगितले आहे. डिफॉल्टर घोषित करण्‍यात आलेले विजय माल्या यांनी ब्रिटनमधून शुक्रवारी याबाबत एक ट्वीट केले आहे.

Pratt अॅण्ड Whitney ग्रुपने देशातील एअरलाईन्स कंपन्यांना निकृष्ट इंजिन पुरवले आहेत.  ग्रुपमधील एका कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही माल्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, P&W कडून पुरवण्यात आलेल्या इंजिनांच्या चौकशीचे आदेश DGCA ने दिले आहेत. देशात कार्यरत असलेल्या एअरबस 320 च्या 21 नव्या विमानांमध्ये निकृष्ट दर्जाच्या इंजिनाचा वापर करण्‍यात आला आहे.

विजय माल्या, विलफुल डिफॉल्टर घोषित...
- न्यूज एजन्सीनुसार, माल्या यांना कोर्टाने विलफुल डिफॉल्टर घोषित केले आहे.
- माल्या सध्या  ब्रिटनमध्ये आहे. त्यांना भारतात परत आण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे.
- किंगफिशर एअरलाइन्ससाठी बँकांकडून घेतलेले कर्ज न फेडल्याचा माल्यांवर आरोप आहे. - - माल्यांवर भारतीय बॅंकाचे सुमारे 9000 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, विजय माल्यांनी काय म्हटले ट्‍वीटमध्ये...

 
बातम्या आणखी आहेत...