आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत महिला COMMANDO, छेडछाड केल्यास पेननेही करतील धुलाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रात्याक्षिक करणा-या महिला कमांडो

नवी दिल्ली - एके-47 च्या जागी हेअर पिन आणि साध्या पेनच्या मदतीनेही शत्रुचा सामना करण्याचे प्रशिक्षण सीआयएसएफच्या महिला कमांडोंना देण्यात येत आहे. या विशेष प्रशिक्षणात अशा महिलांकडे कायम असणा-या अगदी सामान्य वस्तुंचा वापरही शस्त्राच्या स्वरुपात करण्याचे तंत्र शिकवले जाते. या वस्तुंमध्ये पेन, किल्ली, टोपी, हेअर पिन, बेल्टसह इतर वस्तुंचाही समावेश असतो. विशेषतः मेट्रोमध्ये महिलांच्या सुरेक्षेसाठी या महिला कमांडोंना तैनात केले जाणार आहे.

सीआयएसएफ (दक्षिण सेक्टर) चे महानिरीक्षक एच.व्ही. चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार सीआयएसएफच्या या महिला कमांडोंना 50 दिवसांत प्रसिद्ध "पेकिती-तिर्सिया काली' या मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शस्त्र नसले तरी या महिला शरिराच्या काही अवयवांवर अशा प्रकारे हल्ला करतील की, त्यामुळे तो अवयव काम करणेच बंद होइल. त्यानंतर शत्रूवर सहज विजय मिळवता येऊ शकेल. प्रशिक्षणात हात, बोटे, गुडघा, पाय अशा अवयवांचा शस्त्राप्रमाणे वापर करण्याचे तंत्र शिकवण्यात आले आहे. तसेच त्यांना एके-47 रायफल, इनसास रायफल आणि नाइन एमएम पिस्टल डोळे बंद करून उघडण्याचे आणि चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. याचा फायदा शस्त्र खराब झाल्यास होणार आहे.
मेट्रोमध्ये महिलांच्या कोचमध्ये करणार तैनात
या विशेष प्रशिक्षित महिला कमांडोंना मेट्रोमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहे. पहिल्या तुकडीत 25 कमांडोंना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या ग्रुपला ‘अल्फा ग्रुप’ नाव देण्यात आले आहे.

पेकिती-तिर्सिया काली आर्ट
हा फिलीपाइन्समधील मार्शल आर्टचा प्रकार आहे. यात शत्रुला रोजच्या वापरातील वस्तुंच्या मदतीने पराभूत करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यात बचावाच्या पद्धती आणि हल्लेखोराला प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.

पुढील स्लाइड्वर पाहा प्रशिक्षणाचे फोटो..