आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खत सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निधीची गळती रोखण्यासाठी खताची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याची चाचणी सुरू असून लवकरच ती प्रत्यक्ष अमलात आणली जाणार आहे. त्याचबरोबर आगामी काळात आरोग्य विमा व पेन्शनची रक्कमही थेट लाभार्थीच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात येईल, असे केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले.

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, थेट रक्कम हस्तांतरणाद्वारे(डीबीटी) सध्या मनरेगाचे पैसे दिले जात आहेत. शिवाय ‘पहल’ योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरची सबसिडी आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही थेट बँक खात्यात देण्यात येत आहे. आगामी काळात डीबीटीच्या माध्यमातून आरोग्य विमा, पेन्शनची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...