आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फिक्की\'च्या कार्यक्रमात महिलांची प्रशंसा करताना मोदींचे डोळे पाणावले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अहमदाबादमध्ये कॉंग्रेस आणि राहुल गांधींवर आगपाखड केल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी राजधानी दिल्लीत पोहचले आहे. फिक्कीच्या एका कार्यक्रमात महिलांची प्रशंसा करताना मोदींचे डोळेही पाणावले.

आपल्या भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी मोदींनी सगळ्यांची माफी मागितली. कारण संबंधित कार्यक्रम 11 एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. परंतु मोदी सध्या कामात व्यग्र असल्याने कार्यक्रमाची तारीख बदलावी लागली होती.

उल्लेखनीय म्हणजे मोदींनी स्वत:च्या भाषणाला 'प्रवचन' म्हणून संबोधले. मोदीचे वाक्य ऐकताच उपस्थित महिलांमध्ये एकच हश्या पिकला. मोदी म्हणाले की, हे माझे पहिले प्रवचन असे आहे की, याबाबत फेसबुक आणि टि्‍वटरवर महिलांनी मोठ्या संख्येने प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे भाषण करण्‍यापूर्वी फारसी तयारी करावी लागली नाही.

सशक्त भारताचे स्वप्न पाहणार्‍या मोदींनी स्त्रीभ्रूण हत्‍येच्या मुद्दा उपस्थित केला. महिलांचे सशक्‍तिकरण आवश्यक असल्याचे सांगितले.