आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • File Hanging Case Against Italian Soliders, Union Governmetn Give Permission

इटलीच्या सैनिकांविरोधात मृत्युदंडाचा खटला भरणार, केंद्रसरकारची परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय मासेमारांच्या हत्येप्रकरणी केंद्र सरकारने इटलीच्या दोन नौदल सैनिकांविरुद्ध मृत्युदंडाच्या कलमाखाली खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. इटलीच्या न्यायालयाने यास विरोध दर्शवला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिशा स्पष्ट न केल्यामुळे राष्‍ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सध्या या कलमाखाली खटला दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी केली जाणार आहे. गृह मंत्रालयाने सप्रेशन ऑफ अनलॉफुल अ‍ॅक्ट अगेन्स्ट द सेफ्टी ऑफ मेरीटाइप नेव्हिगेशन (एसयूए) अंतर्गत खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे. एनआयएकडून ही परवानगी मागण्यात आली होती. परवानगी देण्यापूर्वी गृह मंत्रालयाने परराष्‍ट्र आणि विधी मंत्रालयाचा सल्ला घेतला होता.
‘खटला बरखास्त करा’
एसयूए कायद्यांतर्गत खटला चालवणे म्हणजे इटलीला दहशतवादी राष्‍ट्रसंबोधणे असा त्याचा अर्थ होतो, असे इटलीकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात उशीर करण्यात आल्यामुळे हे प्रकरण बरखास्त टाकावे, अशी मागणी इटलीच्या सैनिकांनी केली आहे.