आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film On Balasaheb Thackeray Life, Shiv Sena Do On Direction

बाळासाहेबांच्या जीवनावर निघणार चित्रपट, शिवसेनेचे प्रयत्न चालू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना त्यांच्या जीवनावर चित्रपट करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘तुम्ही बोलावलंत; वाट पाहा, २३ जानेवारीला’ या संदेशासह शिवसेनेकडून सोशल मीडियावर चित्रपटाचा प्रचार होत आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर सध्या काम सुरू आहे.
मात्र, त्याबाबत अधिक माहिती सांगता येणार नाही. सूत्रांनुसार, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एका नामवंत दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवायला घेतला आहे. तथापि, तो लघुपट असू शकतो. त्यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.