आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीटीसीची पहिली महिला बसचालक बनली सरिता; बहीण चालवते कॅब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: दिल्लीतील डीटीसीची पहिली महिला बसचालक व्ही.सरिता)
नवी दिल्ली- दिल्ली परिवहन महामंडळाने (डीटीसी) पहिल्यांदा एका महिलेला बसच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवले आहे. तेलंगणामधील नलगोंडा येथील रहिवासी 30 वर्षीय व्ही.सरिताही डीटीसीची पहिली महिला बसचालक ठरली आहे. 'महिला सशक्तिकरणाच्या दिशेने पाऊल उचलणार्‍या आम आदमी पक्षाने सरिताची गेल्या महिन्यातच नियुक्ती केल्याची माहिती परिवहन मंत्री गोपाल राय यांनी दिली.
ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर सरिताची पोस्टिंग सरोजिनी नगर डेपोत झाली. सरिता दिवसपाळीत सेंट्रल दिल्ली भागात बस चालवेल. सरिता सोमवारपासून कामावर रुजू होणार आहे.
सरकारी नोकरी मिळाल्याचा सर्वाधिक आनंद...
पोस्टिंगनंतर पत्रकारांशी बोलताना सरिता म्हणाली की, ती एका गरीब कुटुंबातील असून पाच बहीणींमध्ये सगळ्यात लहान आहे. घरची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळाल्याचा सर्वाधिक आनंद झाला आहे. देशातील महिलांनी स्वत:ला कमी समजू नये. काम, नोकरी कोणतीही असो, महिला करू शकतात. वाहतुकीच्या नियमांचे पालण करण्यासोबत महिला प्रवाशींच्या सुरक्षितेला प्राधान्य देणार असल्याचे सरिताने म्हटले आहे.

सरिताची एक बहीण कॅब ड्रायव्हर...
सरिताची एक बहीण एका खासगी कंपनीत कॅब ड्रायव्हर आहे. डीटीसीमध्ये रुजु होण्यासाठी सरिता देखील एका कंपनीत कॅब चालवत होती. सरिता पाचही बहिणींमध्ये सगळ्यात लहान असल्यामुळे तिच्या वडीलांनी तिला मुलाप्रमाणे वाढवले. सरिताचा ड्रेस सेंस आणि तिची हेअर स्टाइल देखील तरुणासारखीच आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, डीटीसीच्या पहिल्या बसचालक सरिताचे फोटो...