आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांना अखेर मिळाले हक्काचे घर,टिळक मार्गावर फ्लॅट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा घराचा शोध अखेर संपला. शहरी विकास मंत्रालयाने त्यांना फ्लॅट मंजूर केला आहे.मालमत्ता संचालनालयाकडून केजरीवाल यांच्यासाठी टिळक मार्गावरील ग्राउंड फ्लोअरचा सी-2 / 23 फ्लॅट देण्यात आला आहे. टाइप-5 मध्ये हा फ्लॅट येतो. तीन बेडरूमचा हा फ्लॅट आहे. बेडरूमव्यतिरिक्त, बैठक, भोजन कक्ष असे घराचे स्वरूप आहे. बाजूलाच घरगुती नोकरासाठी काही खोल्यादेखील आहेत.
पटियाला हाऊस कोर्टजवळील 1600 चौरस फूट एवढे फ्लॅटचे क्षेत्रफळ आहे. तेथे जवळच प्रशस्त हिरवळ (लॉन) आणि सार्वजनिक उद्यानदेखील आहे. राज्य प्रशासनाकडून केंद्र सरकारकडे निवासाची योग्य व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली होती. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत डीडीयू मार्ग आणि श्यामनाथ मार्गावर काही निवास होते. परंतु केजरीवाल यांना गोले बाजारपेठ या आपल्या मतदारसंघात अर्थात मध्य दिल्लीत घर हवे होते.
अगोदर केजरीवाल यांना भगवानदास रोडवरील दोन ड्युप्लेक्स अपार्टमेंट देऊ करण्यात आले होते, परंतु त्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी हे अपार्टमेंट घेण्यास नकार दिला होता. दरम्यान, केजरीवाल यांना देण्यात आलेल्या नवीन घराच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक खात्यावर सोपवण्यात आली आहे.