आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससीचे जाचक प्रारूप अखेर रद्द; मराठीसह प्रादेशिक भाषांतून परीक्षेस मुभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या (यूपीएससी) प्रारूपातील बदल केंद्र सरकारने रद्द केले आहेत. जुन्या प्रारूपानुसारच परीक्षा होणार असून इंग्रजीची सक्ती नसेल, असे कार्मिक व प्रशिक्षण राज्यमंत्री नारायण सामी यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले.

मुख्य परीक्षा अशी असेल-
- निबंधामध्ये 100 गुणांची इंग्रजीची सक्ती नसेल. पेपर 250 गुणांचा.
- कोणत्याही प्रादेशिक भाषेतून ही प्रश्नपत्रिका सोडवता येईल.
- इंग्रजी व अन्य भारतीय भाषेतून एका पेपरमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल. 0 पेपर प्रत्येकी 300 गुणांचे. गुण मेरिटसाठी ग्राह्य धरणार नाही.
- प्रादेशिक भाषेत पेपर सोडवण्यासाठी किमान 25 उमेदवारांची अटही रद्द झाली.

केवळ ऑनलाईल अर्ज, 4 एप्रिल अंतिम तारीख- यूपीएससीने दिलेल्या माहितीनुसार लोकसेवा परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल असून अर्ज केवळ ऑनलाईन भरता येतील. या वेळी भारतीय वन सेवेसाठीही पूर्वपरीक्षा द्यावी लागेल.