आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Finance Bill Doesn't Passed By Compromising With Government Yashwant Sinha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वित्त विधेयक मंजूरीसाठी सरकारबरोबर कोणतेही तडजोड नाही - यशवंत सिन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चालू अधिवेशनामध्ये वित्त विधयके मंजूर करण्यासाठी सरकारसोबत कोणतीही तडजोड केली नाही. एवढेच नव्हे, तर अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना विमा विधेयक मंजूर होऊ दिले जाणार नसल्याचे सांगितले आहे, अशी माहिती ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी दिली.


वित्त विधेयके मंजूर करण्यासाठी सरकार आणि भाजपमध्ये गुप्त वाटाघाटी झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर सिन्हा यांनी सरकारला कुठल्याही प्रकारचा पाठिंबा देण्याची तयारी नसल्याचे स्पष्ट केले.
चिदंबरम यांनी विमा व निवृत्तिवेतन विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी अधिवेशनापूर्वी लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अनुक्रमे सुषमा स्वराज व अरुण जेटली यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत चिदंबरम यांना विधेयके मंजूर होणे शक्य नसल्याचे सांगितले होते. विमा क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्के ठेवण्याबाबत सरकारने ठाम राहावे. असे असले तरी भाजप पेन्शन फंड रेग्युलटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (पीएफआरडीए) विधेयकाला पाठिंबा देणार आहे. रालोआ सरकारमधील मसुद्यावर प्रस्तुत विधेयक बेतलेले आहे, असा भाजपचा दावा आहे.


‘लालू-मोदी यांच्यात आघाडी’
राजद प्रमुख लालूप्रसाद यादव व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात ‘युती’ झाल्याचा आरोप संयुक्त जनता दलाने केला आहे. दोन्ही नेत्यांमधील वाढत्या जवळिकीमुळे सरदार पटेल यांच्या पुतळ्यासाठी लालूंचे निकटवर्तीय सुनीलकुमार सिंग बिहारमधून पोलाद जमा करण्यास मदत आहेत, असे जदयूचे सरचिटणीस व बिहारमधील मंत्री श्याम रजक यांनी म्हटले आहे. बिस्कोमनचे अध्यक्ष सिंग यांनी मोदींच्या निमंत्रणावरून गुजरातला भेट दिली होती. त्या वेळी त्यांना पोलाद जमा करण्याच्या कामात योगदान देण्यास सांगितल्याचे रजक म्हणाले.