आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हर्स बिडिंगमुळे वीजदर कमी होण्यास मदत; कोळसा लिलावाने वीज स्वस्त : जेटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कोळसाखाणीच्या लिलावामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात वीज देणे शक्य होणार असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. राज्यांकडून विजेसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाला त्यांनी विरोध दर्शवला. रिव्हर्स बिडिंगचा उल्लेख करत ते म्हणाले, यात इंधनाचा खर्च विजेच्या दराशी थेट निगडित राहील. त्यामुळे वीज स्वस्त होईल. कोळसा खाणीच्या लिलावातील पहिला टप्प्यात ई-लिलाव सुरू आहेत. ते २२ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अक्षय ऊर्जा संदर्भातील एका कार्यक्रमात जेटली बोलत होते. ते म्हणाले, सर्व जग आता स्वच्छ विजेकडे आकर्षित होत आहे. केंद्र सरकारही सौर तसेच पवन ऊर्जेवर लक्ष केंद्रित करत आहे. आगामी अर्थसंकल्पात सौर तसे पवन ऊर्जेसाठी खास तरतुदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अर्थमंत्री म्हणाले, जगातील विकसनशील अर्थव्यवस्था झगडत असताना, विदेशातील गुंतवणूकदार भारतावर विश्वास दर्शवत आहेत.ब्रिक्समधील आपल्या मित्र देशांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. चीनने आपल्या धोरणात बदल केला आहे. आता ते िवक्रीवर लक्ष केंद्रित करत आहेत. सेवा क्षेत्रावरही त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात भारताला उत्तम संधी आहेत.
रिव्हर्स बिडिंग म्हणजे काय
सर्वसाधारणलिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपनीला निवडण्यात येते. रिव्हर्स बिडिंगमध्ये मात्र कोळशाचे जास्तीत जास्त दर आधीच निश्चित असतात. कंपन्यांना त्यावर बोली लावावी लागते, तसेच कोणत्या दराने वीज पुरवठा करणार हेही सांगावे लागते. सर्वात स्वस्त वीज देणाऱ्या कंपनीची निवड होते.