नवी दिल्ली - वारंवार होणाऱ्या कॉल ड्रॉपमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचा फटका केवळ सर्वसमान्यांना बसतो असे नाही तर खुद्द देशाचे अर्थ मंत्री अरुण जेठलीसुद्धा कॉल ड्रापच्या समस्येने त्रस्त झालेत. याच कारणाने त्यांनी बुधवारी वोडाफोनचे सीईओ विक्टोरियो कोलाओ यांची चांगलीच कानउघडणी केली. यावेळी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद हेही उपस्थित होते. जेठली म्हणाले, ''सध्याची मोबाइल सेवा पाहात आपण 1995 पूर्वीच्याच काळात आहोत की काय असे वाटते'', असे टोला त्यांनी मारला. त्यावर विक्टोरियो म्हणाले, ''सरकार आणि इंडस्ट्री यांनी एकत्र येत काम केले तर सहा महिन्यांत समस्या दूर होईल'', असे ते म्हणाले.
जेटली नेमके काय म्हणाले ?
''1995 पूर्वी मोबाइल फोन नव्हते. पण, आताची सेवा पाहिली की आपण अजूनही त्याच काळात आहोत की काय, असे वाटते. घर असो की कार्यालय मोबाइलला सिग्नलच मिळत नाही. त्यामुळे महत्त्वाचे कॉल ड्रॉप होतात. परिणामी, नाईलास्तव लॅण्डलाइनचा वापर करावा लागत आहे, असे ते म्हणाले.