आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आमदारावर घरात घुसून मुलीला कि़डनॅप केल्याचा आरोप, तपास सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - येथील बिक्रम मतदार संघाचे काँग्रेस आमदार सिद्धार्थ यांच्यावर एका तरुणीच्या अपहरणाचा आरोप करण्यात आला आहे. 21 वर्षांची तरुणी महिविद्यालयीन विद्यार्थीनी आहे. तिच्या वडिलांनी आमदारांविरोधात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गुरुवारी सकाळी सिद्धार्थ एका मित्रासह घरात घुसले आणि त्यांनी मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेले.

कोण होते आमदारासोबत
तरुणीच्या वडिलांनी सांगितले, की सिद्धार्थ यांच्यासोबत त्यांचा मित्र मुकेश होता. दोघेही एकाच स्कॉर्पियोने आले होते.

दुसऱ्यांदा केले अपहरण
सुत्रांच्या माहितीनुसार हे प्रेम प्रकरण आहे. याआधीही सिद्धार्थ तरुणीला घेऊन फरार झाले होते. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन तिला सोडवले. पोलिसांनी आमदार आणि त्यांच्या मित्राविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. मोबाइल सर्व्हिलन्सने त्यांच्या लोकेशनचा शोध घेतला जात आहे. सिद्धार्थ सध्या फोनही रिसिव्ह करत नाहीत.

खून प्रकरणात झाली होती शिक्षा
- सिद्धार्थ यांचे वडील उत्पल कांत येथील प्रसिद्ध डॉक्टर आहे.
- सिद्धार्थ आता आमदार असले तरी याआधी एका खून प्रकरणात त्यांना शिक्षा झाली होती.
- नवीवत असताना एका मुलासोबत त्यांचे भांडण झाले होते. त्यानंतर सिद्धार्थने त्याची हत्या केली होती.
- याशिवाय त्याच्यावर आणखी तीन गुन्हे दाखल आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो