आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत मेट्रो ट्रेनच्या कोचला लागली आग; डीएमआरसीने फेटाळले आगीचे वृत्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मेट्रोच्या ब्लू लाईन (मार्गावरील) पटेल नगर स्टेशनवर मेट्रो ट्रेनच्या एका कोचला आग लागली आहे. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर ब्लू लाईनवरील वाहतूक सेवा बंद करण्‍यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मेट्रो ट्रॅकवरील विद्युत तारा या खूप जुन्या झाल्या आहेत. त्या बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. पण प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.
-मेट्रोचे प्रवाशी रमेश ठाकूर यांनी सांगितले की, अचानक मेट्रोच्यावर शॉर्ट सक्रिट झाला आणि कोचमधून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर निघाले.
-मेट्रोत धूर शिरतात मेट्रोतील सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवण्यात आले.
- ही मेट्रो ट्रेन द्वारकाहून वैशालीला जात होती.

डीएमआरसीने फेटाळले आगीचे वृत्त...
-दिल्ली मेट्रोचे मुख्य प्रवक्ता अनुज दयाळ यांनी मेट्रो ट्रेनच्या कोचला आग लाग लागल्याचे वृत्त फेटळले आहे.
-dainikbhaskar.com शी बोलताना दयाळ यांनी सांगितले की, या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. चौकशी नंतर सत्य ते बाहेर येईल. मेट्रोच्या कोचमधून केवळ धूर बाहेर आल्याचे दयाळ यांनी म्हटले आहे.
-ब्लू-लाइनवरील सेवा केवळ पाच मिनिटांसाठी बंद करण्‍यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...