आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍लीत भीषण आग; दोन चिमुरडे होरपळले, पोलिसांवर दगडफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाची राजधानी असलेली दिल्ली शुक्रवारी भीषण आगीच्या घटनेमुळे हादरली. बवाना परिसरातील जेजे कॉलनीत शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दोन चिमुरड्यांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या 20 जवानांनी तब्बल शंभर गाड्यांनी संध्याकाळी उशीरा आगीवर नियंत्रण मिळवले.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी परिसरातील सर्व नागरीकांना सुरक्षीत स्थळी हरवले होते. मा‍त्र दिल्‍ली पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर परिसरातील नागरीकांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. आग लागल्याची सूचना देऊनही पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी खूप उशीरा घटना स्थळी पोहचले होते, असा आरोप होत आहे. त्यामुळेचे आगीने रुद्र रुप धारण केले होते.