आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीजवळ भरदिवसा गॅंगवार, दोघांचा मृत्यू, एसयूव्हीने रिक्षाला चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव- दिल्लीजवळील गुडगावमध्ये आज (बुधवार) भर रस्त्यावर गॅंगवार झाले. एमजी मार्गावर सॅंट्रो कारमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी एका एसयूव्ही गाडीवर फायरिंग केली. यात एसयूव्ही गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. फायरिंगनंतर अनियंत्रित झालेली एसयूव्ही एका रिक्षाला धडकली. यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यु झाला असून दोन प्रवाशी जखमी झाले आहेत.

एसयूव्ही गाडीतील एक जण गंभीर जखमी झाला आहे. राकेश हयातपूर असे त्याचे नाव आहे. राकेशवर हत्येसह अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी नऊ वाजता एमजी मार्गावरी सेंट्रल मॉलजवळ हे गॅंगवार झाले. तीन हल्लेखोर सॅंट्रो कारमधून आले होते. राकेशला मारण्याचा त्याचा इरादा असावा. फायरिंगनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.

राकेश हयातपूरवर हत्येसह 10 गुन्हे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राकेश हयातपुरविरुद्ध हत्येसह 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. राकेश जामिनावर सुटका झाली आहे. राकेश बुधवारी सुनावणीला कोर्टात जात होत. त्याचवेळी त्याच्यावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला झाला. राकेश या हल्लयात जखमी झाला आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...