आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे मिळाले होते इंदिरा-फिरोज यांना \'गांधी\' आडनाव, नेहरुंचा होता आयर्न लेडीच्या लग्नाला विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फिरोज गांधी यांच्यासोबत प्रेमविवाह होता. परंतू फिरोज यांचे आडनाव हे गांधी नव्हते. त्यांना ते कसे मिळाले ? इंदिरा त्‍यांच्‍या प्रेमात कशा पडल्‍या? स्वातंत्रसैनिक, पत्रकार आणि माजी खासदार फिरोज गांधी यांची जन्म 12 सप्टेंबर 1912 ला झाला होता, त्यानिमित्ताने या निर्भिड पत्रकाराबद्दल जाणून घेऊ या...
फिरोज गांधी यांना फार कमी आयुष्य लाभले होते. अवघ्या 48 व्या वर्षी, 8 सप्टेंबर 1960 रोजी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

स्वातंत्र सैनिक आणि माजी खासदार फिरोज गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीचे पती आणि देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधींचे वडील होते. एवढीच त्यांची ओळख नाही तर, ते एक निर्भिड पत्रकार देखील होते.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसोबत 1942 मध्ये फिरोज गांधींनी लग्न केले. फिरोज आणि इंदिरा यांची ओळख 1930 मध्ये झाली होती. या ओळखीला निमीत्त झाल्या होत्या इंदिरा गांधी यांच्या आई- कमला नेहरू. भारतीय स्वातंत्र्यासाठी तेव्हा आंदोलन सुरु होते. एका कॉलेजसमोर धरणे आंदोलन सुरु असताना कमला नेहरु बेशुद्ध पडल्या होत्या. तेव्हा फिरोज गांधींनी त्यांची देखभाल केली होती. कमला नेहरूंना टीबी झाल्यानंतर त्यांच्यावर भुवाली येथील टीबी सॅनिटोरियम येथे उपचार करण्यात आले. तेव्हा फिरोज त्यांच्यासोबत राहिले होते. जेव्हा उपचारासाठी त्या यूरोपात गेल्या तेव्हाही फिरोज त्यांना भेटण्यासाठी गेले होते.
1936 मध्ये जेव्हा कमला नेहरुंचे निधन झाले तेव्हा फिरोज गांधी तिथे उपस्थित होते. कदाचित यामुळेच इंदिरांच्या मनाच्या कोपऱ्यात फिरोज यांना स्थान मिळाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या विवाहाला इंदिरांचे वडील जवाहरलाल नेहरु तयार नव्हते. मात्र वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन इंदिरांनी मार्च 1942 मध्ये फिरोज यांच्यासोबत लग्न केले. या लग्नात इंदिरांना मिळालेली सर्वात मोठी भेट म्हणजे महात्मा गांधींनी त्यांचे आडनाव इंदिरा आणि फिरोज यांना दिले. कालांतराने पंडित नेहरुंनीही हे नाते स्वीकारले आणि या लग्नाला मान्यता दिली.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून पाहा कसे जुळले लग्न...
बातम्या आणखी आहेत...