नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री
शशी थरूर यांच्या बरोबरचे ट्विट
सुनंदा पुष्कर यांनी जगजाहीर केल्यामुळे वादाच्या भोव-यात सापडलेल्या पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार काश्मीरवरील ट्विटवरून नव्या वादात सापडल्या आहेत. ‘धड पाकिस्तान सांभाळता येत नाही अन् काश्मीर हवा आहे,’ असे ट्विट तरार यांनी केल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. पाकिस्तान समर्थकांनी तरार यांच्यावर तिखट शब्दांत हल्ले चढवल्यानंतर मात्र त्यांनी पाकिस्तानची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला आहे. तरार यांच्या ट्विटमुळे पाकिस्तानी
ट्विटर युजर्स प्रचंड संतापले आणि त्यांनी तरार यांच्या ट्विटवर अत्यंत कडवट भाषेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानी नागरिकांचा संताप व्यक्त व्हायला सुरुवात झाल्यानंतर मेहर तरार यांनी पुन्हा ट्विट केले की, ‘भारत व पाकिस्तानमधील खरी परिस्थिती जाणून घेण्याची पाकिस्तानी नागरिकांमध्ये क्षमता नाही, असे रिट्विट त्यांनी केले. विरोधात भूमिका घेत असल्याच्या आरोपांचा भडिमार होऊ लागल्यानंतर मात्र पाकिस्तानवर माझे प्रेम आहेच. ते याहीपुढे कायम राहीन, असे शेवटचे ट्विट तरार यांनी केले.
‘पाकिस्तान संभाला जा नही रहा, काश्मीर का नारा याद है.’ फाटा, बलुचिस्तान केपी, कराची आणि अन्य अनेक ठिकाणे नरक बनले आहेत. पाकिस्तानने त्याबाबत आधी विचार करायला हवा’.