आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Iffi Century Award Declared To Wahida Rehman

वहिदा रेहमान यांना इफ्फीचा पहिला शताब्दी पुरस्कार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रेहमान यांना इफ्फीच्या पहिल्या शताब्दी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गोवा येथील इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. चित्रपट सृष्टीच्या शंभरीच्या निमित्ताने इफ्फीने हा पुरस्कार सुरू केला आहे. 77 वर्षीय वहिदा रेहमान यांनी ‘गाइड’, ‘साहेब, बीबी और गुलाम’ या चित्रपटांतील अभिनयाने चाहत्यांवर छाप पाडली आहे.
चित्रपटक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच सदस्यांच्या ज्युरीने रेहमान यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली. चांदीचे सन्मानचिन्ह, शाल व दहा लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदापासून दरवर्षी चित्रपट सृष्टीतील दिग्गज व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रेहमान यांना या आधी 1972 मध्ये पद्मर्शी आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.