नवी दिल्ली/बगदाद-
इराक आणि सीरियात नरसंहार करणारी दहशवादी संघटना 'इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अॅण्ड
इराक'पासून (आयएसआयएस) भारताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चेन्नईतील एक तरुण ISISचा पहिला आत्मघातकी बॉम्ब बनल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
गुप्तचर संस्था याप्रकरणी तपास करत आहेत. हे जर वृत्त खरे निघाले तर भारतासाठी धोक्याची धंटा आहे. ISIS भारतातही आत्मघातकी हल्ले घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आत्मघातकी हल्लेखोर चेन्नईतील?
सीरिया-इराकमधील ISISच्या ताब्यात असलेल्या भागात एका तरुणाने आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात स्वत:ला उडवून घेतलाला तरुण चेन्नईतील रहिवासी असल्याचे वृत्त आहे. याशिवाय ISIS च्या कॅम्पमध्ये भारतातील जवळपास 20-30 तरुण प्रशिक्षण घेत आहेत.