आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • First Solar powered Plane To Start Round the world Trip

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2015 मध्ये भारतात उडणार सौर विमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नित्यनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत आहेत. त्या दिशेने पाऊल टाकताना स्वित्झर्लंडच्या कंपनीने एक नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचे नाव आहे सौर विमान (सोलार प्लेन). त्यासाठी इंधनाची गरज असणार नाही. ते केवळ सौरऊर्जेवर चालेल. 2015 मध्ये हे विमान भारतातून जागतिक प्रवासाला प्रारंभ
अशी आकाराला आली योजना
इंधनाशिवाय विमान उडवणे हे स्विस संशोधक डॉ. बटर्रंड पिकार्ड यांचे स्वप्न होते. मार्च 1999 मध्ये त्यांनी बलून फ्लाइटद्वारे जगाची फेरी 19 दिवस व 55 मिनिटांत पूर्ण केली होती. या प्रवासात त्यांच्यासोबत सहवैमानिक ब्रियान जोन्स हे होते. जागतिक परिक्रमेसाठी त्यांनी 3.6 टन प्रोपेन वायू (इंधन) लागला होता. त्या वेळी त्यांच्या मनात सौरऊर्जेवर चालणार्‍या विमानाची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी स्विस उद्योजक अँड्रे बॉशबर्ग यांच्यासोबत कंपनी सुरू केली. डॉ. बटर्रंड पिकार्ड हे सोलार इम्पल्सचे अध्यक्ष आहेत. ते आपल्या सहकार्‍यांसह मिळू या सौर विमानावर काम करत आहेत.
सौर विमान संकल्पना नेमकी कशी?
स्वित्झर्लंडच्या कंपनीने सोलार इम्पल्सने सौरऊर्जेवर चालणारे (सोलार इम्पल्स एचबी-एसआयए) विमान तयार केले आहे. ते सौर इंधनासारखे काम करेल. त्यासाठी विमानाच्या पंखांवर सिलिकॉनचे सोलार सेल्स लावण्यात आले आहेत.
02 लोक बसू शकतील विमानात
02740 किलो वजन
021.85 मीटर विमानाची एकूण लांबी
0 6. 40 मीटर उंची
040 अंश सेल्सियस तापमानातही उडू शकेल
चार टप्प्यांत विमानाच्या चाचण्या
2009 मध्ये कंपनीने या विमानाची पहिली चाचणी घेतली. ते एक मीटर उंचीपर्यंत व 350 मीटर दूरपर्यंत उडू शकले
2010 मध्ये या सौर विमानाने सलग 26 तास उड्डाण केले. या काळात ते रात्रीच्या वेळीही कोणत्याही अडथळ्याविना उडत राहिले.
2012 मध्ये अँड्रे बॉशबर्ग व डॉ. बटर्रंड पिकार्ड यांनी या विमानातून स्वित्झर्लंड, स्पेन व मोरोक्कोचा प्रवास केला व तो पूर्णपणे यशस्वी ठरला.
2013 मध्ये अमेरिकेच्या मल्टी स्टेज फ्लाइट सेशनमध्ये विमानाची पुन्हा चाचणी घेण्यात आली. नासाच्या एम्स रिसर्च सेंटरने हे विमान जागतिक प्रवासासाठी पूर्णपणे तयार असल्याचे प्रमाणपत्र दिले.
8000 मीटर उंचीपर्यंत वर जाऊ शकते हे विमान. विमानात चार इलेक्ट्रॉनिक मोटर्स बसवण्यात आल्या असून त्या सौरऊर्जेवर चालतील.
50 इंजिनिअरची तुकडी या प्रकल्पावर काम करत असून त्यांची चार टीममध्ये विभागणी झाली आहे.