आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Time A Kinner Won In Mayaor Election In Raigarh In Chhattishgarh

छत्तीसगडमध्ये प्रथमच तृतीयपंथी महापौर, भाजप - काँग्रेस उमेदवारांना चारली पराभवाची धूळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये प्रथमच एक तृतीयपंथीची महापौरपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना पराभवाची धुळ चारून या तृतीयपंथीने विजय संपादन केला आहे. अपक्ष मधु किन्नरने रायगड येथून नऊ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाली आहे.
महानगर पालिकेच्या निवडणुकीत महापौरपदासाठी प्रथमच निवडणूक लढवत असलेलली मधु किन्नर हिचा मुकाबला भाजपच्या महावीर चौहाण आणि काँग्रेसचे जेठूराम मनहर यांच्यासोबत होता. मधूने दोन्ही दिग्गजांना धोबी पछाड देत 9500 मतांनी पराभूत केले. विशेष म्हणजे याआधी या पदावार भाजपचा ताबा होता.
मतमोजणी सुरु झाली तेव्हा पहिल्या फेरीपासून मधूने प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधीत आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत मिळत असलेल्या आघाडीने मधूच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला होता. विजयाची घोषणा झाल्यानंतर मधूने रायगडचा संपूर्ण विकास यालाच प्राथमिकता असणार असल्याचे म्हटले आहे.

याआधी मध्यप्रदेशातील शबनम मौसीने सर्वप्रथम लोकप्रतिनीधी होण्याचा मान मिळविला आहे. शबनम मौसीने 2000 मध्ये मध्यप्रदेशातील सोहागपूर विधानसभा मतदारसंघातून 18 हजार मतांनी विजय मिळविला होता. तेव्हा शबनम मौसी जेवढ्या फरकाने विजयी झाली होती, तेवढी मते काँग्रेस आणि भाजप उमेदवारांना एकत्रितही मिळाली नव्हती. 2012 मध्ये मात्र शबनम मौसीला फक्त 112 मते मिळाली होती.