आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठव्या वर्षी पहिला शो, जगात २५ हजार कॉन्सर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-
वयाच्या आठव्या वर्षी विजयवाडा येथे पहिला शो आणि ८६ वर्षे वयापर्यंत जगभरात २५ हजारपेक्षा जास्त कॉन्सर्ट. आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील संकरागुप्तम येथे ६ जुलै १९३० रोजी जन्मलेले एम. बालामुरलीकृष्णा यांना सहजपणे कर्नाटक संगीतातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व ही उपाधी मिळाली नाही. जन्मानंतरच आईचे निधन झाले, पण वडिलांनी केलेला सांभाळ आणि गुरूच्या सान्निध्यात त्यांना बालपणापासूनच संगीताचा गोडी लागली.

मूळ रूपाने गायक असलेले बालामुरली यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बासरी, व्हायोलिन, वीणा आणि मृदंगम यांसारखी वाद्येही उत्तमपणे वाजवत असत. त्यांनी कर्नाटक संगीताला अनेक रागांची देणगी दिली. त्यात गणपती, सर्वश्री, महाती, लवांगी यांचा समावेश आहे. सिद्धी, सुमुखम या रागांतही त्यांनी तीन आणि चार तालाचे प्रयोग केले. संगीताला नवा आयाम देणारे अशीही त्यांची ओळख होती. त्यामुळेच शास्त्रीय कलावंत असतानाही त्यांनी चित्रपटांतही काम केले.
दक्षिण भारतातील अनेक चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आणि ४०० पेक्षा जास्त चित्रपटांना संगीतही दिले. जगभरात संगीताचे सादरीकरण करताना त्यांनी शास्त्रीय संगीतातील पं. भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया आणि किशोरी अमोणकर यांच्यासोबत एकत्रित कार्यक्रम केले. अनेक दशकांपर्यंत संगीत जगतात त्यांच्या योगदानाची देशातच नव्हे तर जगानेही प्रशंसा केली. फ्रान्सच्या सरकारने कला-संगीतासाठी त्यांना ‘ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर’ या पुरस्काराने गौरवले. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. देशभरातील अनेक राज्यांनीही विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.
बातम्या आणखी आहेत...