आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Convicts Get 14 Days Court Custody In The Case Of Rape

डेन्मार्कच्या महिलेवरील अत्याचारप्रकरणी पाच आरोपींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डेन्मार्कच्या 51 वर्षीय महिलेवर अत्याचार करणा-या पाच नराधमांना दिल्ली न्यायालयाने 6 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.या नराधमांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना गुरुवारी अतिरिक्त महानगर दंडाधिकारी सुधांशु कौशिक यांच्यासमोर हजर करण्यात आले.त्यावेळी महेंदर उर्फ गंजा,मोहम्मद रझा,राजू सिंह,अर्जुन व राजू या नराधमांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण ताब्यात घेण्यात आले आहेत.एक अद्यापही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन अल्पवयीन तरुणांची किशोरवयीन न्यायालयीन मंडळासमोर सुनावणी सुरु आहे.
अत्याचार झाल्यानंतर ही महिला दुस-या दिवशी डेन्मार्कला निघून गेली होती. गुरुवारी सरकारी वकिलांनी पोलिसांच्या तपासातील प्रगतीबद्दल माहिती दिली. महिलेवर अत्याचार झाल्यास डेन्मार्कच्या डॉक्टरांनीही दुजोरा दिला असून आरोपींची ओळख परेड व तपासात सहकार्य करण्यासाठी तिला भारतात बोलावण्याचेही प्रयत्न सुुरू आहेत असे वकिलांनी सांगितले.