आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीतील मानसरोवर पार्कमध्ये एकाच कुटुंबातील 4 महिलांसह 5 जणांची निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राजधानीतील मानसरोवर पार्कमध्ये एकाच कुटुंबातील 4 महिलांसह 5 जणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (शनिवार) सकाळी जिंदल ऑईल मिल परिसरात ही घटना घडली.

शाहदरा जिल्हा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बंद पडलेल्या जिंदल ऑईल मिलच्या परिसरात बनलेल्या अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये चार महिलांची निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. तसेच घराबाहेर तैनात सुरक्षारक्षकाला अज्ञात मारेकर्‍याने ठार मारले आहे.

जिंदल मिल ही सात भावांच्या मालकीची आहे. त्यापैका एका भावाच्या कुटुंबातील चार महिलांची हत्या करण्‍यात आली आहे.

पोलिसांनी पंचनामा करून पाचही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. हत्या झालेल्या महिलांमध्ये उर्मिला जिंदल (82), त्यांच्या तीन मुली- संगीता गुप्ता (56), नूपुर जिंदल (48), आणि अंजली जिंदल (38) यांचा समावेश आहे. सर्व महिलांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. सुरक्षारक्षक राकेश (42) याचा मृतदेह तळमजल्यावर सापडला. प्रॉपर्टीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...