आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Latest Development About AAP And Arvind Kejriwal In Delhi Elections

दिल्लीतील राजकीय सुनामीनंतर \'आप\'शी संबंधित 5 ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- अरविंद केजरीवाल यांनी राजनाथसिंह यांची भेट घेतली.)
दिल्लीत काल आम आदमी पक्षाच्या बाजूने राजकीय सुनामी आली. एकूण 70 जागांपैकी तब्बल 67 जागा आपच्या पदरात पडल्या. पहिल्यांदाच एका पक्षाला एवढे मोठे बहुमत मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा स्टार कॅम्पेनर आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासारखा इलेक्शन मॅनेजर असतानाही या पक्षाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.
जाणून घ्या, आप आणि अरविंद केजरीवाल यांच्याशीसंबंधित 5 ताज्या घडामोडी...
1) अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. या भेटीच्या वेळी ते मोदींना शपथविधीचे निमंत्रण देतील. उद्या सकाळी 10.30 वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे.
2) केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी यावेळी केजरीवाल यांनी केली. यावेळी आपचे मनिष शिसोदिया त्यांच्यासोबत होते.
3) कलंकित नेत्यांना आमदारकीच्या तिकीटा दिल्याने आम आदमी पक्षाचे मार्गदर्शक शांतीभूषण अद्यापही अरविंद केजरीवाल यांच्यावर नाराज आहेत. आपच्या शपथविधीला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपच्या नेत्यांवर भ्रष्टाचारापासून अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
4) अरविंद केजरीवाल आज केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत. आपने जनतेला दिलेली आश्वासने पाळण्यासाठी नायडू यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण राहणार आहे.
5) रामलिला मैदानावर होणाऱ्या शपथविधीला केंद्रीय कॅबिनेट मंत्री, भाजपचे दिल्लीत सात खासदार आणि भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना बोलविले जाणार आहे.