आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच प्रश्न सिसोदियांना : 'आप'ल्यासोबतच्या पत्रकारांनाही ‘पेड न्यूज’ला विरोध करायला हवा होता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. माध्यम प्रतिनिधींना कारागृहात टाकण्याच्या केजरीवाल यांच्या वक्तव्यावर तुम्ही काय सांगणार ?
उत्तर- त्यांनी सगळ्या माध्यमप्रतिनिधींबद्दल तसे म्हटलेले नाही. फक्त ‘पेड न्यूज’च्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा विरोध झालाच पाहिजे. पेड न्यूजवर कारवाईसाठी पहिल्यांदाच कोणी तरी बोलले आहे. ‘दिव्य मराठी’ तर आपल्या पहिल्या पानावर ‘नो पेड न्यूज’ मोहीम चालवत आहे.
2. आपच्या एका सहकार्‍याने तर प्रिंट मीडियावरदेखील आरोप केले आहेत. सर्वच प्रसारमाध्यमे विकाऊ आहेत?
उत्तर - आपच्या कोणत्याही नेता-कार्यकर्त्याने एकूणच मीडियाला विकाऊ म्हटलेले नाही. आमचा ‘पेड न्यूज’ला विरोध आहे.
3. तुमच्यासोबत जे पत्रकार आहेत त्यात एक टीव्ही वाहिनीचा प्रबंध संपादक आहे, त्यांनी कधी पेड न्यूजविरोधात भूमिका घेतली होती?
उत्तर - हे काम सर्वच पत्रकारांनी केले पाहिजे. त्यांनी केले की नाही यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की, मीडियात अशी मोहीम सुरू होऊ शकत नाही? आमच्यासोबत आलेल्या पत्रकारांनीसुद्धा असे करायला हवे होते.
4. केजरीवाल यांचे वक्तव्य चुकले असल्यास त्यावर तुम्ही माफी मागणार?
उत्तर - प्रथमत: त्यांनी काही म्हटलेलेच नाही. जे दाखवले जात आहे तो संपादित भाग आहे. एखाद्या वाहिनीवर हे सिद्ध झाल्यास त्या टेपबद्दल कळवा.
5. आपला वाहिन्यांवर भरपूर प्रसिद्धी मिळाली. आपने एखाद्या वाहिनीशी सौदा केला किंवा पैसे देऊन आपल्या बातम्या दाखवल्या?
उत्तर - मी कधी ना अशा कोण्या वाहिनीशी सौदा केला, ना कोणी माझ्यासमोर तसा प्रस्ताव ठेवला. मी अशा पेड न्यूजच्या प्रकारावर विश्वास ठेवत नाही. मी खात्रीने सांगतो की, आपचा कोणी कार्यकर्ता, नेता किंवा सदस्य अशा सौदेबाजीमध्ये कधी सामील नव्हता आणि होणारही नाही. कोणी आम्हाला तशा प्रकारचा प्रस्ताव दिला किंवा तसे संकेत दिले तरी आम्ही त्याची कानउघाडणी करू, त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडू.