आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five State Assembly Election Counting Today, Congress Vs BJP

मतमोजणीला सुरुवात, \'असेच\' निकाल लागले तर रंगात येईल अशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/दिल्ली/जयपूर/रायपूर- चार राज्यांमध्ये आज (रविवार) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात झाली. निकाल जाणून घेण्यासाठी मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणांबाहेर राजकीय कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी गर्दी केली आहे.
चार राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज सायंकाळपर्यंत हाती येतील. दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. या चारही राज्यांत भाजपचे सरकार येण्याचे संकेत एक्झिट पोलवरून मिळत आहेत. ते जर खरे असेल, तर दिल्ली व राजस्थानमध्ये हातची सत्ताही काँग्रेसला गमावून बसावे लागेल. निकालानंतर जे काही सांगितले जाणार आहे. त्याबाबतचा हा रंजक वृत्तांत..
'आमच्या जागा, मतांचा टक्का वाढला'
खरेही आहे. परंतु एका मताने जिंकला तरी तो आमदार आणि हारला त्याचा नामोल्लेखही होत नाही, ही राजकारणातील वस्तुस्थिती आहे. दुसरे असे की एका जागेने का होईना, परंतु ज्याचे बहुमत त्याचेच सरकार.
मध्य प्रदेश : शिवराज मध्य प्रदेशचे मोदी होणार का?
2003, तेव्हा दिग्विजय सिंह यांना हॅट्ट्रिकची संधी होती. त्यांची सत्ता गेली. विधानसभेच्या 230 जागांपैकी काँग्रेसला 38 जागा मिळाल्या. आता 2013, शिवराजसिंहांनाही तीच संधी. चार एक्झिट पोलनुसार त्यांना 137 जागा मिळतात. म्हणजे सलग तिसर्‍यांदा सत्ता मिळवणारे ते पहिलेच मुख्यमंत्री. 2003 मध्ये काँग्रेसला 31.6 टक्के तर भाजपला 42.5 टक्के मते मिळाली होती. 2008 मध्ये काँग्रेसच्या मतांत 1 टक्का वाढ, तर भाजपच्या 5 टक्के घट झाली तरीही सत्ता भाजपकडेच राहिली होती.
छत्तीसगड : काँग्रेसचा संघर्ष तरीही रमण डोईजड
सलग तीन वेळच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या मतांच्या टक्केवारीतील फरक तीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता असताना, तेथे दोन वेळा भाजप 50 जागा मिळवून सत्तेत आणि अनुक्रमे 37 व 38 जागा मिळालेली काँग्रेस विरोधी पक्षात बसली. रमण सरकारवर भ्रष्टाचार व निष्क्रिय प्रशासनाचे आरोप. तरीही चार एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 39, भाजपला 49 जागा मिळतील; परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, काँग्रेसच्या जागाही वाढतील आणि मतांची टक्केवारीही; परंतु ती सत्तेपासून दूरच राहील.
सायंकाळपर्यंत: ज्योतिरादित्य शिंदेंच्या नेतृत्वातील पराभवावर काँग्रेसचे उत्तर असेल : त्यांना वेळच कमी मिळाला, तर भाजप त्यांच्या जागा कमी झाल्यावर ही अँटी इन्कम्बन्सी आमदारांच्या विरोधातील आहे, काही मंत्र्यांचेही काम खराब होते, असे भाजप म्हणून शकते.
सायंकाळपर्यंत: एक्झिटपोल तर रमणसिंह यांचे सरकार स्थापन होताना दाखवत आहेत; परंतु जागांमध्ये भाजप अडचणीत सापडली, तर मारल्या गेलेल्या काँग्रेस नेत्यांना मिळालेली ती सहानुभूती असल्याचे सांगण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, तर काँग्रेस हे रमणसिंहांचे अपयश असल्याचे सांगेल.
'कामे लोकांपर्यंत पोहोचली नाहीत'
राजस्थान : एकदा काँग्रेस, एकदा भाजपची परंपरा
2008 मध्ये वसुंधराराजे यांच्या सरकारचा पराभव करून अशोक गहलोत मुख्यमंत्री बनले. मतांच्या टक्केवारीतील फरक केवळ 2.5 टक्के. या वेळी भाजपचे पारडे जड आहे. स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. 123 जागा भाजपला, तर 54 जागा काँग्रेसला. काँग्रेसने अशोक गहलोत यांच्या स्वच्छ प्रतिमेचा आधार घेऊनही भाजपला 45 जागांचा फायदा, तर काँग्रेसचे 42 जागांचे नुकसान.
दिल्ली : ‘आप’ मैदानात उतरल्यामुळे नुकसान
शीला दीक्षितांनी सलग तीन वेळा स्पष्ट बहुमत मिळवून दिल्लीची सत्ता काबीज केली होती. या वेळी आम आदमी पार्टी (आप) मैदानात उतरल्याने लढत तिरंगी आणि अटीतटीची झाली. शीला सरकारवर भ्रष्टाचार आणि महिलांना संरक्षण न दिल्याचा आरोप. पर्याय भाजप किंवा आप. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत एक्झिट पोलच्या सरासरीनुसार भाजपला 36, काँग्रेसला 19 आणि आपला 16 जागा मिळतील. म्हणजे स्पष्ट बहुमत.
सायंकाळपर्यंत : आमच्या सरकारने जनकल्याणाची अनेक कामे केली. अशोक गहलोत यांची प्रतिमा स्वच्छ आहे; परंतु त्यांच्या सरकारमधील काही मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप झाल्याने लोकांमध्ये संताप होता. नाही तरी राजस्थानमध्ये लोकांनी एक वेळ निवडून द्यायचे आणि दुसर्‍यांदा पराभूत करायचे अशी परंपराच निर्माण केली आहे. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट होते.
दिल्ली : ‘आप’ मैदानात उतरल्यामुळे नुकसान
शीला दीक्षितांनी सलग तीन वेळा स्पष्ट बहुमत मिळवून दिल्लीची सत्ता काबीज केली होती. या वेळी आम आदमी पार्टी (आप) मैदानात उतरल्याने लढत तिरंगी आणि अटीतटीची झाली. शीला सरकारवर भ्रष्टाचार आणि महिलांना संरक्षण न दिल्याचा आरोप. पर्याय भाजप किंवा आप. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत एक्झिट पोलच्या सरासरीनुसार भाजपला 36, काँग्रेसला 19 आणि आपला 16 जागा मिळतील. म्हणजे स्पष्ट बहुमत.