आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five State Assembly Election Counting Today, Congress Vs BJP

.. आणि राष्ट्रीय नेतृत्वाकडून काही बचाव, तर्क व टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चारही राज्यांत एक्झिट पोल काँग्रेसला पराभव दाखवत आहेत. त्यामुळे निकालानंतर या पक्षाची प्रतिक्रियाही मनोरंजक राहील. 2014 च्या निवडणुकीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही आणि मोदींची जादू चाललेली नाही.. इत्यादी इत्यादी.
1. मोदींची जादू चालली नाही :
मध्य प्रदेशात शिवराजसिंह, छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्या नेतृत्वाला मते मिळाली. मोदींनी या दोन राज्यांत 33 सभा घेतल्या, पण त्यामुळे ना भाजपच्या जागा वाढल्या ना मतांची टक्केवारी. म्हणजेच नरेंद्र मोदीची लाट किंवा जादू चालली नाही.

2. राहुलजींमुळे मते वाढली :
मध्य प्रदेश व छत्तीसगडसाठी तर हा तर्क हमखास कामी येईल. परंतु राजस्थान आणि दिल्लीसाठी काही नवीन शोधावे लागेल. या निकालांचे विश्लेषण करू, त्यासाठी समिती स्थापन करू, असे नेहमीच्या धाटणीचे ठोकळेबाज विधानही येऊ शकते.
3. ही चार राज्ये म्हणजे देश नव्हे :
या चार राज्यांतील निकाल येण्याआधी 2009 नंतर 21 राज्यांत निवडणुका झाल्या. काँग्रेसने 177 जागा जिंकल्या, 86 जागा गमावल्या. उलट भाजपने 46 जागा जिंकल्या, 133 गमावल्या. म्हणजेच काँग्रेस भक्कम आहे. लोकसभा निवडणुकीत ही चारच राज्ये भूमिका बजावणार नाहीत. या चार राज्यांत लोकसभेच्या 72 जागा आहेत. 400 जागा अशा आहेत की तेथे भाजपचे अस्तित्व नाही.
4. विधानसभेच्या उलटच येतात लोकसभेचे निकाल 2003 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आली. परंतु पुढच्याच वर्षी 2004 मध्ये लोकांनी केंद्रात सरकारसाठी काँग्रेसला मते दिली. 2008 मध्ये विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला कौल दिला पण केंद्रात पुन्हा काँग्रेसला संधी दिली. त्यामुळे विधानसभेच्या निकालावरून लोकसभेचा अंदाज बांधलाच जाऊ शकत नाही.
5. एक्झिट पोलवर विश्वास नाही :
उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा एक्झिट पोलचे निकाल काँग्रेससाठी आव्हानात्मक मानत असले तरी सरचिटणीस दिग्विजयसिंहांच्या मते ते कचरापेटीत फेकण्याच्या लायकीचे आहेत. पक्षानेच एक्झिट पोलवर बहिष्कार टाकला आहे. निकाल व एक्झिट पोलमध्ये थोडाही फरक निघाला तरी एक्झिट पोल भंपक आहेत, हे आम्ही आधीच सांगितले होते असेच काँग्रेस म्हणेल.