आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घायाळ काँग्रेस \'संजीवनी\'साठी या पाच उपायांवर करु शकते विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 2004 पासून 2014 पर्यंत सत्ता उपभोगलेल्या काँग्रेला आता विरोधीबाकावर बसण्याची वेळ आली आहे. येथेही त्यांना अधिकृत विरोधीपक्ष म्हणून मान्यता मिळण्यात अडचणी येत आहेत. लोकसभा निवडणूकीत पक्षाचा झालेला दारूण पराभव आणि त्यानंतर एकानंतर एक उघड होत असलेले अंतर्गत कलह यामुळे पक्ष त्रस्त झाला आहे. हे कमी की काय म्हणून काँग्रेसच्या जुन्या 'विश्वासूं'नी पुस्तके लिहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची झोप उडविली आहे. याच वर्षी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुका आहेत. काँग्रेसच्या जुन्या आणि नव्या नेत्यांच्या बंडखोर भूमिकेमुळे आता काँग्रेस संसदेत 44 अंकावर थांबली ती या निवडणुकांमध्ये एवढीही कामगिरी करते की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. देशातील सर्वात जुना पक्ष अशी ख्याती असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या सर्वसाधारण निवडणुकीतील पराभव आणि पक्षाची स्थिती मजबूत करण्यावर विचार मंथन सुरु आहे. या स्थितीत काँग्रेसला काही उपाय सुचवले जाऊ शकतात ज्यामुळे या पक्षाला नव संजीवनी मिळू शकते.
काय करु शकते कांग्रेस
प्रथम उपाय
काँग्रेसने सर्वप्रथम पक्षातील मठाधिपतींना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. कारण या मोजक्या काही नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा भ्रष्ट आणि घमेंडखोर झाली आहे. सुरेश कलमाडी, मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शीद, अभिषेक मनु सिंघवी आणि श्रीप्रकाश जयसवाल या नेत्यांचा यात समावेश आहे. यांनी त्यांच्या कारनाम्यामुळे पक्षासमोर मोठे संकट उभे केले होते. यात बेनी प्रसाद वर्मा या ज्येष्ठ नेत्याचा देखील समावेश आहे. यांची स्वतःची निवडून येण्याची क्षमता नाही आणि दुसर्‍यांना निवडून आणण्याचा प्रश्नच नाही.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काँग्रेसला संजीवनी मिळू शकेल असे चार उपाय