आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Willful Researchers From Twenty Years Fighting Against Dengue

डेंग्यूविरुद्ध वीस वर्षांपासून लढणारे पाच जिद्दी संशोधक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉक्टर ब्रुनो गाय - Divya Marathi
डॉक्टर ब्रुनो गाय
डेंग्यू - दरवर्षी लाखो लोकांना याचा संसर्ग होतो. दिल्लीपासून रिओ दी जानेरिओपर्यंत. हा संसर्ग कसा नष्ट होईल यासाठी ६० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ना औषध निघाले, ना लस. मात्र, काही ध्येयवेड्यांनी डेंग्यूला पराभूत करण्याचा विडाच उचलल्याने आता आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
फ्रान्स - डॉक्टर ब्रुनो गाय
१७ वर्षांच्या परिश्रमानंतर डेंग्यूवर उपकारक पहिली लस
हे आहेत डॉ. ब्रुनो गाय. १७ वर्षंापासून डेंग्यूवर इलाज शोधत आहेत. फ्रान्सची कंपनी सनोफी पाश्चरचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ब्रुनो आणि त्यांच्या टीमने डेंग्यूवरील पहिली लस जवळपास तयार केल्यात जमा आहे. ईमेलच्या माध्यमातून ब्रुनो यांनी "दिव्य मराठी' नेटवर्कला सांगितले की, हे तेवढे सोपे काम नव्हते. डेंग्यूमध्ये चार प्रकारचे विषाणू असतात. यातील अडचण म्हणजे एखादा प्रयोग एका प्रकारच्या विषाणूवर यशस्वी ठरतो, इतर विषाणूंवर परिणाम होत नाही. दोनवर होतो किंवा अन्य दोघांवर होत नाही. मात्र, सनोफीच्या सीवायडी- टीडीव्हीचे चांगले निष्कर्ष आहेत. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित अभ्यासात म्हटले की, ही लस तीनपैकी दोन मुलांवर परिणामकारक ठरली आहे. सनोफी पाश्चरच्या वरिष्ठ संचालिका अपर्णा थॉमस (कम्युनिकेशन अँड सीएसआर, दक्षिण आशिया) यांनी सांगितले की, कंपनीने या लसीची जगभरात वैद्यकीय चाचणी केली आहे. जागतिक स्तरावर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही पूर्ण झाली असून आता ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारतात दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. फ्रान्समध्ये या लसीच्या निर्मितीसाठी उत्पादन प्रकल्पही स्थापन केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही लस प्रगतीच्या टप्प्यावर असल्याचे म्हटल्यामुळे आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून वाचा, चार जिद्दी संशोधकांबद्दल..