आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flashmob Performance To Welcome Students Back To College

FLASHMOB : विंटर ब्रेकनंतर कॉलेजमध्ये परतलेल्या विद्यार्थ्यांचे धडाक्यात स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याच्या पार्श्वभूमिवर दिल्लीतील काही कॉलेजेसना ब्रेक (काही दिवसांची सुटी) देण्यात आला होत. या ब्रेकनंतर बुधवारपासून पुन्हा दिल्ली विद्यापीठातील महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे महाविद्यालयात येणा-या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे विद्यार्थ्यांचे एका फ्लॅशमॉब द्वारे स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
त्याचबरोबर एका डेटींग अॅपच्यावतीनेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत सोडण्यासाठी मोफत रिक्षांची सुविधा देण्यात आली. सुमारे 40 रीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी कॉलेजपर्यंत प्रवास केला.
पुढील स्लाइड्वर पाहू, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या Flashmob चे Photo