आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध होताच २४ तासांत फ्लिपकार्टचा पाठिंबा, अखेर "नेट न्यूट्रॅलिटी'ची भलामण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फ्लिपकार्टला शेवटी झुकावेच लागले. कंपनी आता एअरटेलसोबत झीरो प्लॅन आणणार नाही. सोशल मीडियावर प्रचंड विरोधानंतर फ्लिपकार्टने हा निर्णय घेतला. कंपनीने गेल्या आठवड्यात एअरटेलसोबत "एअरटेल झीरो प्लॅटफार्म’चा करार केला होता. त्यानुसार, एअरटेल ग्राहकांना फ्लिपकार्टसोबत निवडक अॅप्स मोफत वापराची सुविधा होती. त्याचे शुल्क ग्राहक नव्हे, कंपनी भरणार होती.

फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल सोमवारी म्हणाले होते की, विदेशी कंपन्यांनी भारतात असे केले की त्याला इनोव्हेशन म्हटले जाते. मात्र, हेच भारतीय कंपन्यांनी केले ते उल्लंघन होते. मंगळवारी ते म्हणाले, लोकांना मोफत इंटरनेट मिळेल, हे आधी योग्य वाटले. मात्र गहनपणे विचार केला असता उमगले की हे सर्व नेट न्यूट्रॅलिटीविरुद्ध आहे.
पुढील स्लाइड्वर वाचा, काही महत्त्वाची माहिती...