आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Flood Alert In Srinagar, Jhelum Above Danger Mark

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरमध्ये पुराचा कहर, 70 व-हाडींची बस नदीत कोसळली, वैष्णोदेवी यात्रा बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - मदतकार्य करणारे जवान नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत.)

जम्मू - काश्मीरमध्येगेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी नौशहरा येथे वऱ्हाडाची बस उलटून 70 जण वाहून गेले. गाडीत नवरदेवही होता. सायंकाळी उशिरापर्यंत एकही मृतदेह आढळून आला नाही.
मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांत 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. सरकारने 65 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लष्कर, पोलिस घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. दुसरीकडे राज्यातील झेलम, चिनाब, तवी, मनावरसह अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्व महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
वैष्णव देवी यात्राही बंद
सरकारने मुसळधार पावसामुळे रविवारपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर माता वैष्णोदेवी यात्राही तूर्त बंद करण्यात आली आहे.
राजधानी श्रीनगरमध्ये झेलम नदीसह अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. मृतांमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. लष्कराचे जवान मदत कार्य करत असून, हेलिकॉप्टरद्वारे मदतकार्य पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पूरस्थितीचे PHOTOS